तप्त उन्हाळा असो, धुवाधार पाऊस की गारठवून टाकणारी थंडी. ऋतू कोणताही असला
या उपक्रमाविषयी के. एन. पाटील सांगतात, एखाद्या गोष्टीचा इतका लळा लागावा की त्याचेच नेहमी स्मरण राहावे. वारकरी जसा पंधरवडय़ाची एकादशी करतो, वर्षांतून एकदा वारी करतो तद्वत प्रत्येक शिवभक्ताने रायगडाला भेट देऊन छत्रपतींच्या विचारात मग्न राहिले पाहिजे. आजवर के. एन. पाटील शेकडो वेळा रायगडाला गेले असून त्यांच्याबरोबर पहिल्यांदा रायगड पाहणाऱ्यांची संख्या हजारात आहे. वीर शिवा काशिद पुण्यतिथीच्या निमित्ताने कागल तालुक्यातील नाभिक समाजातील काही तरुण १३ तारीख ही तिथी मानून प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेस नेबापुरातील वीर शिवा काशिद समाधीजवळ एकत्रित जमतात. समाधीचे पूजन करतात. शिवरायांचा जयघोष करतात. शिवा काशिद यांच्या स्मृतींना उजाळा देतात. तथापि, या तरुणांना मध्यंतरी या उपक्रमात सातत्य राखता आले नाही. ही गोष्ट के. एन. पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांचे एक निष्ठावंत सहकारी संदीप जंगम यांनी हा उपक्रम बंद होऊ द्यायचा नाही असा निश्चय केला. गेली पाच वर्षे प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन ते करतात. वीर शिवा काशिद स्मारक लोकार्पण सोहळा वाजत-गाजत होईल, पण नंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होईल, तेव्हा के. एन. पाटील व संदीप जंगम हे दोन शिवभक्त नि:शब्दपणे करीत असलेले कार्य सुगंध पसरवत राहील.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
के. एन. पाटील, संदीप जंगम यांच्या अनोख्या शिवकार्याचे स्मरण
तप्त उन्हाळा असो, धुवाधार पाऊस की गारठवून टाकणारी थंडी. ऋतू कोणताही असला तरी त्यांच्या शिवभक्तीच्या प्रेमाला ओहोटी कधीच येत नाही. वीरमरण आलेल्या वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन, शिवरायांच्या कर्तृत्वाला मुजरा, मराठेशाहीतील ऐतिहासिक घटनांना उजाळा असा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला किल्ले पन्हाळगडावर पार पडतो.
First published on: 01-02-2014 at 03:32 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remembered the shiva work of a n patil sandeep jangam