तेरा संचालकांचा विरोध डावलून नगर अर्बन सहकारी बँकेच्या काल झालेल्या संचालकांच्या बैठकीत बँकेच्या नवीन शाखा उघडण्याचा तसेच शाखांचे नुतणीकरण करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. विषय मंजुर करण्यासाठी तज्ज्ञ व कर्मचारी संचालकांची बँकेचे अध्यक्ष, खासदार दिलिप गांधी गटास मदत झाली.
बँकेच्या संचालक मंडळाची लवकरच निवडणुक होणार असल्याने निवडणुकीचा खर्च अपेक्षितच आहे यासह शाखा विस्तारीकरणाच्या विषयाला विविध आक्षेप घेत निवडणुकीनंतर तरतुद करुन शाखाविस्तार करावा आदी कारणे देत विरोध करणारे पत्र १३ संचालकांनी बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. बँकेच्या निवडून आलेल्या २५ पैकी १३ संचालकांनी विरोध केल्याने अध्यक्ष गांधी यांचा गट अल्पमतात आल्याचे मानले जात होते.
काल (गुरूवारी) झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय मंजुरीच्या बहुमतासाठी दोन तज्ज्ञ संचालक, दोन कर्मचारी संचालक व प्रभारी कार्यकारी संचालक यांची गांधी यांना मदत झाली. या पाच जणांना मतदानाचा अधिकार नसला तरी विषय मंजुरी व गणपुर्तीसाठी विचारात घेतले जाते. १३ संचालकांच्या विरोधाचे पत्र प्रशासनाने सभेपुढे सादरच केले गेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of arban bank branch sanction even after against of 13 director