अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व सर्पमित्र विकास माने याने पाच फूट लांबीचा नाग पकडला. कराड तालुक्यातील उंडाळे येथे अधिक पाटील यांच्या शेतात ज्या ठिकाणी हा नाग पकडला गेला त्या परिसरात नागाची अंडीही मिळून आली आहेत.
प्राणिमित्र असलेल्या विकास माने याने आजपर्यंत सहाशेहून अधिक विषारी साप, घोरपडींसह अन्य प्राणी, पक्ष्यांना जीवनदान दिले आहे.
उंडाळे येथे अधिक पाटील यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या नांगरात अडकलेला नाग दिसला. ही माहिती मिळताच विकास तातडीने घटनास्थळी आला. त्याने नागाला पकडले. आसपास नागाची अंडीही आढळून आली. सर्प व जखमी पक्षी आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन विकास माने याने केले .
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-11-2012 at 03:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake friend had resuses one snake