- माझ्याकडे जुनी आय२० मॅग्ना ही गाडी आहे. मला ही गाडी विकून नवीन हॅचबॅक गाडी घ्यायची आहे. जी आय२० पेक्षा चांगली असेल. माझे बजेट सात लाख रुपये आहे.
– अमित शिंदे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- तुम्ही नक्कीच मारुती ब्रेझा घ्यावी. हिचे डिझेल मॉडेल सात ते साडेसात लाखांपर्यंत उपलब्ध आहे. आणि हिचा मायलेज तुम्हाला सर्वात जास्त मिळेल. आय२० पेक्षा ही गाडी नक्कीच उत्तम आहे.
- मी टियागो आणि केयूव्ही१०० या दोन गाडय़ांचा विचार केला आहे. या गाडय़ा विभिन्न आहेत. यापैकी कोणती चांगली आहे, कृपया सांगा.
– अभिजित जेजुरकर
- टियागो ही गाडी खूप चांगली आहे आणि क्वालिटीही चांगली आहे. केयूव्ही खूप उंच गाडी आहे. तुम्हाला टॉलबॉय डिझाइन कार हवी असेल तर नक्कीच केयूव्ही ही गाडी घ्या. अन्यथा टियागो उत्तम आहे.
- माझा रोजचा प्रवास ६० ते ७० किमीचा आहे. मला दोन आठवडय़ांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा माझ्या गावी जावे लागते, जे की १५० किमी लांब आहे. माझे बजेट पाच लाख रुपये आहे. मी कोणती गाडी घ्यावी?
– अजयकुमार जाधव
- सर्वोत्तम गाडीचा पर्याय हवा असेल तर मारुती सुझुकीची सेलेरिओ डिझेल मॉडेल घ्या. तिचे इंजिन खूपच चांगले आहे आणि ही गाडी प्रतिलिटर २५ किमी एवढा मायलेज देते. झेडडीआय मॉडेलमध्ये डय़ुएल एअरबॅग्ज आहेत आणि एबीएसही आहे. मात्र, ही गाडी तुम्हाला सहा लाखांना मिळेल.
- मी टाटा टियागो एक्सझेड पेट्रोल ही गाडी घेण्याचा विचार करतो आहे. माझे बजेट साडेपाच लाख रुपये एवढे आहे. टियागो ही चांगली गाडी आहे का, की तुम्ही अन्य कोणता पर्याय सुचवाल.
– श्रीकांत चौधरी
- टियागो एक्सझेड किंवा तिचे टॉप मॉडेल हे सर्वोत्तम आहे. आणि तिच्यातील सुरक्षेचे फीचर्सही सर्वोत्तम आहेत. त्यामुळे तुम्ही गाडी घ्यायला हरकत नाही.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com
First published on: 24-06-2016 at 01:09 IST
मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to buy