World Longest Hair Woman Smita Srivastava : प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपले लांबसडक, घनदाट केस असावेत. यासाठी महिला अनेक गोष्टी करत असतात. विविध प्रकारचे तेल, सिरम, शॉम्पू- कंडिशनर वापरून त्या केसांची काळजी घेत असतात. पण, प्रत्येकीचे केस लांबसडक होत नाहीत. परंतु, काही लोक त्यांचा छंद इतका नेटाने फॉलो करतात की, ते स्वतःच एक उदाहरण बनतात. यात उत्तर प्रदेशातील ४६ वर्षीय स्मिता श्रीवास्तव यांचा समावेश आहे.
स्मिता श्रीवास्तव यांच्या नावे सर्वात लांब केस असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. स्मिता स्वतःला ‘रिअल रॅपन्झेल’ म्हणवतात. वयाच्या १४ व्या वर्षांच्या असल्यापासून त्यांनी आपले केस कापले नाहीत, यामुळे आता त्यांच्या असाधारण केसांची लांबी ७ फूट आणि ९ इंच आहे. तिला जगातील सर्वात लांब केस असल्याचा अभिमान आहे, त्या त्यांचे केस कधीही कापत नाही, तसेच ते धुण्यासाठी त्यांना जवळपास ४५ मिनिटे लागतात.
त्यांना लांबसडक केस सुकविण्यासाठी तीन हेअर ड्रायर वापरावे लागतात. स्मिता उभ्या राहण्यापूर्वी जमीन साफ करतात, जेणेकरून केस जमिनीवर लोळून खराब होणार नाहीत. केसांमधील गुंता सोडवण्यासाठी त्या साधा कंगवा आणि हातांचा वापर करतात.
“लांबसडक केसांसाठी वर्ल्ड रेकॉर्ड जिंकण्याचे स्वप्न पूर्ण”
स्मिता यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितले, “मला माझे केस आवडतात, मी रोज एकदा तरी वर्ल्ड रेकॉर्ड जिंकायचे असे स्वप्न पाहत होते. अखेर देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि हे स्वप्न सत्यात उतरवले, अशा प्रकारे माझ्या केसांना अधिक ओळख मिळावी, जेणेकरून मी आणखी नवा विक्रम करू शकेन.”
आई आणि बहिणीकडून मिळाली प्रेरणा
लांब केसांच्या त्यांच्या आवडीबद्दल बोलताना स्मिता म्हणतात की, “माझी पहिली प्रेरणा माझी आई आणि माझ्या बहिणी आहेत, कारण माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचे केस सुंदर आहेत. माझी दुसरी प्रेरणा म्हणजे ८० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी. त्या काळातील अभिनेत्रींचे सुंदर लांब केस होते, ज्यामुळे मला स्वतःचे केस वाढवण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या समाजात लांब केस हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. मला आशा आहे की, जोपर्यंत मी केसांना योग्यप्रकारे हाताळू शकते तोपर्यंत ती पूर्ण आत्मविश्वासाने सांगते की, मी माझे केस कधीही कापणार नाही आणि ते वाढवत राहीन. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे.
केस धुण्यास आणि कोरडे करण्यासाठी लागतात तीन तास
GWR नुसार, स्मिता सहसा आठवड्यातून दोनदा केस धुते. धुणे, कोरडे करणे, डिटेंगलिंग आणि स्टाइलिंग यासह संपूर्ण प्रक्रियेस प्रत्येक वेळी तीन तास लागतात. त्या त्याचे केस धुण्यासाठी ४५ मिनिटे घालवतात, नंतर ते सुकविण्यासाठी तीन ड्रायर वापरतात आणि नंतर हातांनी आणि फणीने केसांमधील गुंता सोडवला दातो, ज्याला सहसा आणखी दोन तास लागतात.
More Stories On Trending : अरे, ही लोकल ट्रेन आहे की ब्युटी पार्लर! महिलांची video तील कृती पाहून युजर्स म्हणाले, “अपॉइंटमेंट फिक्स…”
तुटलेले केस करतात गोळा
स्मिता म्हणाल्या की, ब्रश केल्याने किंवा धुतल्यानंतर गळणारे केस ती कधीही फेकून देत नाही. तिने सांगितले की, “गेल्या २० वर्षांत मी माझे केस फेकले नाहीत. माझ्याकडे खूप मोठा संग्रह आहे. एके दिवशी माझे खूप केस गळून पडले, पण केस फेकून देण्याच्या विचाराने मला वाईट वाटले. मी रडू लागले. पण माझा रेकॉर्ड लोकांना केस वाढवण्यास आणि सौंदर्य वाढवणारे नैसर्गिक उपाय अवलंबण्यास प्रेरित करू शकतो.
नैसर्गिक शॅम्पू वापरतो
जागतिक विक्रम केल्यानंतर स्मिता सांगतात की, त्या केसांना कात्रीपासून दूर ठेवतात. याशिवाय त्या कृत्रिम शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर न करता नैसर्गिकरित्या केसांची काळजी घेतात. यासाठी अंडी, कांद्याचा रस आणि कोरफड यांसारख्या घटकांसह नैसर्गिक औषधी वनस्पती एकत्र करून ते केसांवर वापर करतात. स्मिता असेही सांगतात की, जेव्हाही त्या त्यांचे केस मोकळे ठेवून बाहेर जातात, तेव्हा पाहणारे “चकित” होतात. लोकांना कोणाचे इतके लांब केस असू शकतात यावर विश्वास बसत नाही.