भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याचं आता सिद्ध झालं आहे. सानिया मिर्झाबरोबर वेगळं झाल्यानंतर शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यामुळे सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं खेळातील करिअर आणि तिच्या आर्थिक परिस्थितीविषयी जाणून घेऊयात. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सानिया मिर्झाने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिअन ओपननंतर खेळातून निवृत्ती घेतली होती. मिर्झाने आतापर्यंत दुहेरी प्रकारात सहा जेतेपदं जिंकली आहेत. २०१५ मध्ये दोन, २००९, २०१२, २०२४ आणि २०१६ मध्ये प्रत्येक स्पर्धेच्या जेतेपदावर तिने कब्जा केला होता. तसंच, ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरही पोहोचली होती. एप्रिल २००५ मध्ये महिला दुहेरीत तिने पहिलं स्थान पटकावलं होतं. तर, सातत्यपूर्ण कामगिरीसह ती ९१ आठवडे अव्वल स्थानी विराजमान होती. तसंच, टाइम मासिकाच्या जागतिक स्तरावरील १०० सर्वांत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले होते.

हेही वाचा >> “प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आवडता विषय म्हणजे…”, सानिया मिर्झाचा टीव्ही शोमधील ‘तो’ VIDEO व्हायरल

द ब्रिजने नोंदवल्यानुसार, मिर्झाने खेळात प्राविण्य मिळवल्यामुळे ती आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाली. खेळासह तिला अनेक जाहिरातीही मिळाल्या. तिने अनेक कंपन्यांच्या जाहिरातीद्वारे चांगली कमाई केली. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये जागतिक क्रमांक १ वर पोहोचल्यावर तिला प्रतिवर्ष ६० ते ७५ लाख रुपये जाहिरातीतून मिळत असे. तिच्या एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये टाटा टी, टीव्हीएस स्कूटी आणि बोर्नविटासारखे ब्रँड आहेत. DNA नुसार, २०२२ पर्यंत टेनिस आणि जाहिरातींमधून तिची वार्षिक कमाई २५ कोटी रुपये होती. सध्या, ती झिंदा तिलिस्मथ, लॅक्मे इंडिया आणि लिवोजेनसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती करते.

२०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकबरोबर लग्न केल्यावर सानिया मिर्झाच्या वैयक्तिक आयुष्याला कलाटणी मिळाली. तसंच, या जोडप्याला मुलगा इझान झाला. या जोडप्यात ऑल इज नॉट वेल असल्याच्या बातम्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून समोर येत आहेत. दरम्यान, शनिवारी शोएब मलिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. त्याने सानियाला घटस्फोट न देताच तिसरा विवाह केला असल्याचेही वृत्त पसरले होते. परंतु, सानिया मिर्झाने याबाबत खुलासा करून काही महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाल्याचं तिने मान्य केलं.

हेही वाचा >> तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

सानियाने काही महिन्यांपूर्वीच दिला होता घटस्फोट

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर आता सानिया मिर्झाचे कुटुंबीय, बहीण अनम व तिच्या टीमने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. “सानियाने तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सर्वांपासून दूर आणि वेगळं ठेवलं. काही महिन्यांआधीच ती आणि शोएब विभक्त झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झालेला आहे. शोएबला तिने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सानियाच्या आयुष्यातील हा अतिशय संवेदनशील काळ आहे. त्यामुळे तिच्या सगळ्या चाहत्यांनी प्रायव्हसी जपून तिच्या निर्णयाचा आदर करा.” असं अनम मिर्झाने शेअर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

२०१० मध्ये या दोघांचं लग्न झालं

२०१० मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचं लग्न झालं. या दोघांचा प्रेमविवाह आहे. २००३ मध्ये हे दोघं पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीत दोघांमध्ये फार चर्चा झाली नाही. त्यानंतर दुसरी भेट होण्यासाठी बराच वेळ गेला. मात्र त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि २०१० मध्ये या दोघांनी लग्न केलं. २०१८ मध्ये शोएब आणि सानियाला मुलगा झाला. ज्याचं नाव इजहान मिर्झा मलिक आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza a look at her luxurious lifestyle career net worth marriage and divorce with shoaib malik sgk