What is a Vajacial And Why Should You Get One | Loksatta

‘वजेशियल’ – ‘त्या’ ठिकाणचं ‘फेशियल’!

सौंदर्य क्षेत्रात दररोज नवनव्या ब्युटी ट्रीटमेंटस् उपलब्ध होत आहेत. ‘वजेशियल’ (वजायनल फेशियल) हा त्यातला एक नवा उपचार. अनेकांना हे वाचायला आश्चर्यकारक किंवा विचित्र वाटलं, तरी मोठ्या शहरांत हा उपचार लोकप्रिय होतो आहे.

‘वजेशियल’ – ‘त्या’ ठिकाणचं ‘फेशियल’!

वैष्णवी देशपांडे

चेहऱ्यावरचे डाग, काळसरपणा, टॅन, व्हाइटहेडस्, ब्लॅकहेडस् कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण ‘फेशियल’ करतो, शरीराची त्वचा नितळ दिसावी व चमकावी यासाठी ‘बॉडी पॉलिशिंग’ करतो, अगदी तसंच हल्ली ‘त्या’ भागातलं- अर्थात ‘बिकिनी एरिया’चं फेशियलही हल्ली केलं जातं. त्याला म्हणतात ‘वजेशियल’. काय? वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे आणि हे भारतात बहुतेक मोठ्या शहरांमध्ये उपलब्धही आहे.

‘वजेशियल’ – म्हणजे काय?

वजेशियल- ‘वजायनल फेशियल’- वर म्हटल्याप्रमाणे ‘बिकिनी एरिया’चं फेशियल असतं. अधिक उलगडून सांगायचं, तर यात त्या जागच्या फक्त बाहेरच्या भागाचं- ज्याला Vulva असंही म्हटलं जातं, त्याचं फेशियल केलं जातं, योनीचं नाही.

वजेशियल का करतात?

‘ब्राझिलियन वॅक्स’ किंवा ‘बिकिनी वॅक्स’ सध्या खूप प्रचलित आहे. अर्थात, ते करावं की नाही हा चर्चेचा विषय असला, तरी तो वैयक्तिक निर्णय आहे. वॅक्स केल्यानंतर ब-याचदा छोटे किंवा ‘इनग्रोथ’ असलेले केस नीट न निघाल्यानं अशा ठिकाणी ब्लॅकहेडस् चा त्रास उद्भवतो. तसंच सततच्या घर्षणानं हा भाग बाकीच्या अवयवांपेक्षा काळपटही दिसतो. अशा वेळी हे कमी करण्यासाठी आणि ‘रीलॅक्स’ वाटण्यासाठी वजेशियल उपयोगी ठरतं असं सांगितलं जातं.

वजेशियल कसं करतात?

जसं चेहऱ्यासाठी फेशियल करतात त्याच पद्धतीने वजेशियलमध्ये बिकिनी भागाचं फेशियल केलं जातं. वॅक्सिंग केल्यानंतर तो भाग दोन वेळा क्लिंझरनं स्वच्छ केला जातो, त्यानंतर सौम्य स्क्रब आणि स्टीमच्या सहाय्यानं डेड स्किन (मृत त्वचा) काढली जाते. यामुळे त्वचेवरची ‘पोअर्स’ बंद झाली असतील तर तीही उघडतात व त्वचा व्यवस्थित स्वच्छ होते. त्यानंतर स्पेशल सिरम आणि मास्क लावला जातो. मास्क काढल्यानंतर ट्विझरनं इनग्रोथ केस काढले जातात. शेवटी परत सिरम लावलं जातं. यानंतर बिकिनी भागातली त्वचा पहिल्यापेक्षा जास्त मुलायम वाटू लागते.
वजेशियल करण्यासाठी साधारण ४५-६० मिनिटं लागतात. बिकिनी एरिया बाकी भागांपेक्षा जास्त संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असतो. त्यामुळे या जागी वापरायची उत्पादनं थोडी वेगळी आणि सौम्य असतात. नेहमीचा साबण किंवा शॅम्पू या जागी वापरू नये.

वजेशियल साधारणत: कोणी करतं?

नववधू किंवा परदेशात बीचवर फिरायला जाणाऱ्या स्त्रिया ही ट्रीटमेंट करून घेताना जास्त आढळतात. ज्यांना ‘इनग्रोथ’चा त्रास आहे, अशा स्त्रियादेखील हे करून घेऊ शकतात.

वजेशियल करायला किती खर्च येतो?

या ट्रीटमेंटची किंमत प्रत्येक सलून आणि भागावर अवलंबून आहे, तरीही साधारणत: १५००-३००० रुपये शुल्क आकारलं जातं.

वजेशियल किती वेळा करावं?

वजेशियल एक ते दोन महिन्यातून एकदा करावं. एका सेशनमधे खूप जास्त फरक दिसून येत नाही, त्यामुळे त्याचे सिटिंग्ज घ्यावे लागतात. तुमच्या समस्येनुसार किती सिटिंग्ज लागतील ते ठरतं.

स्वतःचं स्वतः घरी करता येतं का?

यासाठी आपण रोज वापरायच्या विशेष प्रॉडक्ट्सनी बिकिनीचा भाग स्वच्छ ठेवू शकतो, परंतु इनग्रोथ केस काढायला एक्स्पर्टच पाहिजे, नाहीतर त्वचा अधिकच खराब होऊ शकते. त्यामुळे या विषयातल्या तज्ञाकडूनच ही ट्रीटमेंट करून घेणं फायद्याचं ठरतं.

सौंदर्य क्षेत्रात रोज नवनवे उपचार येत आहेत आणि लोकप्रियही होत आहेत. त्यातला हा तुलनेनं नवा उपचार. मात्र शहरांमध्ये काही स्त्रिया हे करून घेत आहेत. अर्थात सर्वच स्त्रियांना वजेशियल करून घ्यावंसं वाटणार नाही, परंतु ‘ती’ जागा आणि त्या जागची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहावी यासाठी आपण प्रयत्न निश्चित करू शकतो.

(लेखिका मेकअप आणि हेअर क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.)
vaishnevideshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवरात्री उत्सव: आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व

संबंधित बातम्या

लवकर म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार