* तब्बल ६८% वाढ
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याबाबत केलेला प्रचार-प्रसार आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ते भरण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. यंदाच्या वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या तब्बल ६८.३ टक्क्यांनी वाढली असून १.२३ लाख कोटी करदात्यांनी ही प्रक्रिया पार पाडली आहे.
कर-निर्धारण वर्ष २०१२-१३ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदत ३१ जुलै रोजी संपत असताना यंदा तिला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. अधिकाधिक करदात्यांनीincometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून विवरणपत्र भरावे, असे आवाहन अखेरच्या क्षणापर्यंत करण्यात येत होते. वार्षिक पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ‘ई-रिटर्न’ यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. यातून यंदा ५ ऑगस्टपर्यंत ८७ लाखांहून अधिक करदात्यांनी ऑनलाइन विवरणपत्र दाखल केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या माध्यमातून विवरणपत्र दाखल करणारे ८५ टक्क्यांनी वाढले आहेत. शेवटच्या दिनी, ५ ऑगस्ट रोजी विवरणपत्र दाखल करणारे तब्बल ६.९२ लाख करदाते नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षी ७३.१ लाख करदात्यांनी ‘ई-रिटर्न’ दाखल केले होते. यंदा ती संख्या १.२३ लाख कोटी झाली आहे. आयटीआर-१ व आयटीआर-२ या वेतन श्रेणीतील करदात्यांची संख्याही ८५.८ टक्क्यांनी वाढली आहे. या श्रेणीत विवरणपत्र दाखल करणारे गेल्या वेळच्या ४६.९० लाखांच्या तुलनेत ५.८७ कोटी झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2013 रोजी प्रकाशित
सव्वा कोटी करदात्यांकडून यंदा ‘ई-रिटर्न’ दाखल
* तब्बल ६८% वाढ प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याबाबत केलेला प्रचार-प्रसार आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ते भरण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. यंदाच्या वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या तब्बल ६८.३
First published on: 08-08-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 25 crores tax payers pay by e return