LIC च्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करून महिन्याला मिळणार १२ हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या तपशील

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सरल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरावे लागेल. यानंतर तुम्हाला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १२ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते.

LIC
एलआयसीची अशीच एक पॉलिसी आहे जिचं नाव आहे 'सरल पेन्शन स्कीम'. (Photo : Indian Express)

LIC Pension : भारतीय आयुर्विमा महामंडळ देशाची सर्वात विश्वसनीय आणि मोठी विमा कंपनी आहे. अनेकदा लोकांच्या गरजांनुसार हे विमा पॉलिसी सादर करतात. एलआयसीची अशीच एक पॉलिसी आहे जिचं नाव आहे ‘सरल पेन्शन स्कीम’. यामध्ये एकदाच प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते. तुम्हालाही वयाच्या ६० वर्षांनंतर सुरक्षित भविष्य हवे असेल आणि दैनंदिन खर्चासाठी गुंतवणूक करायची असेल, तर एलआयसीची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

काय आहे ही स्कीम?

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सरल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरावे लागेल. यानंतर तुम्हाला वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १२ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. जाणून घेऊया या योजनेची तपशील माहिती.

सरल पेन्शन स्कीममध्ये मिळणार दोन फायदे

या योजनेत ‘लाईफ ऍन्युटी विथ 100% रिटर्न ऑफ पर्चेस प्राईज’ अंतर्गत पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत त्याला दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. यादरम्यान जर त्यांचा मृत्यू झाला तर प्रीमियम नॉमिनीला परत केला जातो. परंतु, केवळ पेन्शनधारक व्यक्तीच या योजनेतून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ घेऊ शकते.

जॉईंट लाईफ पेन्शन योजना

यामध्ये पतिपत्नी दोघेही सहभागी होऊ शकतात. दोघांपैकी जे कोणी दीर्घकाळ जिवंत राहतील त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला प्रीमियमची रक्कम मिळेल.

सरळ पेन्शन योजनेशी निगडित महत्त्वाच्या बाबी

>> एलआयसीच्या या योजनेत ऑनलाइन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येऊ शकते.

>> पॉलिसी घेताच पेन्शनधारकांना पेन्शन सुरु होते.

>> यात मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शनची निवड करता येईल.

>> या योजनेत किमान १२ हजार रुपयांची वार्षिक गुंतवणूक आणि कमाल गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही.

>> ४० ते ६० वर्षे वय असणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

>> पॉलिसी सुरू झाल्यापासून ६ महिन्यांनंतर कर्जाची सुविधा मिळते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A one time investment in lic scheme will get a pension of rs 12000 per month know details pvp

Next Story
झोमॅटोचा शेअर एका आठवड्यात ३२ टक्क्यांनी आपटला, कोटक सेक्युरिटीजच्या मते गुंतवणुकीची संधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी