उत्पादनांची श्रेणी लवकरच वाहन मेळ्यात
हिंदुजा समुहातील अशोक लेलँडने बांगलादेशातील ढाका येथे नवा वाहन जुळवणी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ महिन्यांमध्ये ३७ एकर जागेवर हा प्रकल्प आकारास येईल.
अशोक लेलँड आणि आयएफएडी ऑटोज लिमिटेड, बांगलादेश यांच्यातील धोरणात्मक संलग्नितता भागीदारीतून साकारणाऱ्या या प्रकल्पातून तयार होणारी वाहने लवकरच होणाऱ्या ‘इंडो—बांगला ऑटोमोटिव शो’मध्ये सादर केली जाणार आहेत.
अशोक लेलँड लिमिटेडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विनोद के. दासरी यांनी याबाबत सांगितले की, विस्तारीत उत्पादनांच्या श्रेणींसह अशोक लेलँड आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठीच्या साखळी विस्तार आणि विशेष उत्पादनांसाठी कार्यरत आहे. अशोक लेलँडसाठी बांगलादेश ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे.
आयएफएडी ऑटोज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तस्कीन अहमद म्हणाले की, बांगालादेश ही जलद गतीने विकसित होणारा देश आहे. या परिस्थितीत अशोक लेलँड वाहने देशाच्या पायाभूत सुविधांसाठी वरदान ठरू शकेल. आम्ही अशोक लेलँडबरोबर एका सामथ्र्यशील नातेसंबंधात प्रवेश करण्याकडे लक्ष देत आहोत. हीच आमची याआधीही भूमिका होती.