शांघाय येथे शाखा सुरू करत अॅक्सिस ही चीनमधील पहिली भारतीय खासगी बँक ठरली आहे. देशातील तिसरी मोठी खासगी बँक असलेल्या अॅक्सिसला चीनमध्ये शाखा सुरू करण्यास तेथील बँक नियामक आयोगाची सप्टेंबर २०१३ मध्ये परवानगी मिळाली होती.
विदेशातील या शाखेत परकी चलन व्यवहारासह अन्य बँकिंग व्यवहारही होतील. जागतिक अर्थव्यवस्थेत चीनला असलेले महत्त्वाचे स्थान पाहता बँकेचे येथील अस्तित्व आम्हाला ग्राहकांना अधिक सेवा देण्याची जबाबदारी दर्शविते, असे बँकेचे शाखाप्रमुख राजकुमार खोसा यांनी सांगितले. भारतातील आघाडीच्या या बँकेचे विविध आठ देशांमध्ये शाखा व कार्यालये आहेत. बँकेच्या भारतातील १,५०२ शहरे व गावांमध्ये २,२२५ शाखा व ११,७९६ एटीएम आहेत.
सुगुना फूड्सचा नाशिकजवळ प्रकल्प
मुंबई : कुक्कुटपालन क्षेत्रातील आघाडीच्या सुगुना समुहाने महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पाची घोषणा केली असून यासाठी १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे.
सुगुना फूड्स समूह हा ५,००० कोटी रुपयांच्या उलाढालीचा असून भारतातील विविध १६ राज्यांमध्ये त्याचे अस्तित्व आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरराजन यांनी नाशिकनजीकच्या खडकजांब येथे हा वार्षिक ५ लाख टन क्षमतेचा प्रकल्प असेल, असे सांगितले.
या प्रकल्पासाठी आयडीबीआय बँकेने अर्थसहाय्य केल्याची माहितीही त्यांनी दिली. ब्रॉयलॉर उद्योगाची वार्षिक वाढ ९ टक्के दराने होण्याची आकडेवारी दिली जात असून वार्षिक ३०० कोटी ब्रॉयलरसह भारत या क्षेत्रात जगातील पाचवा मोठा देश गणला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
अॅक्सिस बँकेची शांघायमध्ये शाखा
शांघाय येथे शाखा सुरू करत अॅक्सिस ही चीनमधील पहिली भारतीय खासगी बँक ठरली आहे. देशातील तिसरी मोठी खासगी बँक असलेल्या अॅक्सिसला
First published on: 09-01-2014 at 06:47 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Axis bank opens branch in shanghai