नवीन वर्षाच्या आज ( १ जानेवारी ) पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणाताही बदल झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजपासून १९ किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर राजधानी दिल्लीत १७६८ रुपयांना मिळणार आहे. तर, मुंबईत १७२१ रुपयांना, कोलकातामध्ये १८७० रुपयांना मिळेल. सर्वांत जास्त किंमत चेन्नईत असून, तिथे १९७१ रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

हेही वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा भडका; जाणून घ्या नवीन दर

इंधन कंपन्यांनी ६ डिसेंबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. तेव्हा इंधन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली. होती. २०२२ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १५३ रुपयांची वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला इंधन कंपन्या गॅस दरवाढीबाबत निर्णय घेतात. एकतरी किंमतीत वाढ होते, किंवा घट करण्यात येत असते.

हेही वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं, जाणून घ्या चांदीचे दर

२०२२ मध्ये चारवेळा गॅस किंमतींत दरवाढ नोंदवण्यात आली होती. पण, नवीन वर्षाच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करुन हॉटेल धारकांना मोठा झटका दिला आहे. तर, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अद्यापही कोणतीही वाढ झाली नाही.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commercial lpg gas price hiked by 25 first day of new year 2023 ssa