खासगी क्षेत्रातील स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करणारी कंपनी, कॉन्फिडेंस पेट्रोलियमने ‘गो गॅस’ नावाने व्यावसायिक वापराच्या एलपीजीचे वितरण मुंबईत सुरू केले असून त्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
गो गॅस एलपीजीचे वितरण १७ किलो, २१ किलो, ३३ किलोच्या सिलेंडरने केले जात आहे. याशिवाय मागणीनुसार ४ किलो व १२ किलोचेही सिलेंडर बाजारात पुरविण्यात येतील. त्याद्वारे एलपीजी हॉटेल, उद्योग व इतर व्यवसायांना पुरविण्यात येतो आहे. कॉन्फिडेन्स पेट्रोलियम ही सरकारी तेल कंपन्यांना सिलेंडर बनवून देणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी आहे.
अल्पावधीत गो गॅस आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेमुळे ग्राहकांची पहिली पसंती झाला आहे. कंपनीला एमडीआरए या संस्थेतर्फे क्र. १ चे रेटिंग प्राप्त आहे. गो गॅस आज महाराष्ट्रात नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक व कर्नाटकमध्ये बंगळुरू, तामिळनाडूमध्ये चेन्नई, मदुराई, कोईम्बतूर, आंध्रप्रदेशमध्ये हैदराबाद, पंजाबमध्ये मोहाली, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेशात इंदूर व भोपाळ येथे उपलब्ध आहे. लवकरच विजयवाडा, विशाखापट्टणम, उदेपूर, भोपाळ व अन्य ठिकाणी गो गॅस उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी राज्य व्यवस्थापक अलोक खालको यांच्याशी संपर्क साधता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
‘गो गॅस एलपीजी’आता मुंबईतही
खासगी क्षेत्रातील स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करणारी कंपनी, कॉन्फिडेंस पेट्रोलियमने ‘गो गॅस’ नावाने व्यावसायिक वापराच्या एलपीजीचे वितरण मुंबईत सुरू केले असून त्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
First published on: 28-05-2015 at 05:23 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go gas lpg