आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना विषाणूच्या उद्रेकाचे एकूण अर्थव्यवस्थेवरील परिणाम समजून घेण्यासाठी कित्येक वर्षांचा अवधी लागू शकेल, असा इशारा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी दिला आहे.

जागतिक किर्तीचे अब्जाधीश बफे अध्यक्ष असलेल्या बर्कशायर हॅथवेची दरवर्षी ४० हजार भागधारकांच्या उपस्थितीत पार पडणारी वार्षिक सभा कंपनीच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन पद्धतीत पार पडली.

शनिवारी पार पडलेल्या ५५ व्या वार्षिक सभेत बर्कशायर हॅथवेचे मुख्यालय असलेल्या अमेरिकेच्या नॅब्रेक्सा राज्यातील ओमाहा शहरातून बफे यांनी सभेला संबोधित केले.

भविष्यात मोठय़ा बँकांना विषाणूच्या सावटाबाहेर पडताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल; परंतु २००८ च्या वैश्विक संकटापेक्षा जग आर्थिकदृष्टय़ा अधिक चांगल्या स्थितीत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कमालीची अस्पष्टता अनुभवत असल्याचे नमूद करत बफे यांनी व्यक्त केला. करोना संकटामुळे आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनात बदल झालेला नाही, असे ते म्हणाले. यापूर्वी अमेरिकेने युद्ध आणि मोठय़ा नैराश्यांना तोंड दिले असल्याचा दाखलाही बफे यांनी दिला.

बफे यांनी भागधारकांच्या  प्रश्नांना याहू फायनान्सच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर दिली. त्यांच्या समवेत भागधारकांच्या प्रश्न्न उत्तरे देण्यासाठी कंपनीच्या विम्या व्यतिरिक्त  व्यवसायाचे प्रमुख आणि बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष ग्रेग एबेल हे सहभागी झाले होते.

वॉरन बफे यांनाही गुंतवणूक फटका;  विमान कंपनी गुंतवणुकीतून निर्गमन

बफे यांच्या कंपनीने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात केलेली सर्व गुंतवणूक काढून घेतली आहे. पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून विमाने जमिनीवर आहेत. यामुळे विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी त्यांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला आहे. बफे यांच्या कंपनीने डेल्टा एअरलाइन्समध्ये मोठी गुंतवणूक केली होती. बफे यांनी सांगितले की, करोना उद्रेकाआधी नागरी हवाई क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार केला होता. हवाई क्षेत्राला करोना उद्रेकाचा मोठा झटका बसला आहे. देशात हवाई वाहतूक क्षेत्र पूर्णपणे बंद असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बर्कशाय हॅथवेला तिमाहीत विक्रमी ५० अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ill take many years to understand the implications of the corona crisis abn