भारतीय निर्मिती उद्योगाच्या दृष्टीने २०१३ चा प्रारंभ शुभ ठरला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गमक मानले जाणाऱ्या औद्योगिक उत्पादनाचा दर जानेवारीत वधारून २.४ टक्के झाला आहे. गेल्या सलग दोन महिने घसरणीच्या फेऱ्यात अडकलेल्या या दरांमुळे आता तमाम उद्योग क्षेत्राच्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांनी मात्र अपेक्षा उंचावल्या आहेत.
डिसेंबर २०१२ मधील ०.५ टक्के आणि जानेवारी २०१२ मधील १ टक्का औद्योगिक उत्पादन दराच्या तुलनेत यंदाची वाढ मध्यवर्ती बँकेला येत्या १९ मार्चच्या मध्य तिमाही आढाव्यात किमान पाव ते अध्र्या टक्क्याची कपात करण्यास वाव देणारी असल्याचे मत केंद्रीय सरकार स्तरावरूनही व्यक्त करण्यात आले आहे.
यंदा केवळ खनिकर्म आणि भांडवली वस्तू उद्योगाची नोंद नकारात्मक स्थितीत झाली आहे. तर निर्मिती क्षेत्राची वाटचाल २.७ टक्के राहिली आहे.
            जाने २०१३    डिसें २०१२    जाने २०१२

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औद्योगिक उत्पादन दर    २.४%        -०.५%        १.०%
निर्मिती            २.७%        -०.७        १.१%
खनिकर्म                   -२.९%        -३.४%        -२.१%
विद्युत निर्मिती        ६.४%        ५.२%        ३.२%
भांडवली वस्तू        -१.८%        -०.६%        -२.७%
ग्राहकोपयोगी वस्तू                २.८%        -३.६%        २.५%
देशातील औद्योगिक उत्पादनातील यंदाने यंदा वाढ नोंदविली असली अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येत आहे, असे म्हणणे आताच फार घाईचे ठरेल. आम्ही नजीकच्या कालावधीत यापेक्षा अधिक वाढ अपेक्षित करत आहोत.
अदि गोदरेज, अध्यक्ष, भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय).
जानेवारी २०१३ मधील वधारते औद्योगिक उत्पादन वाढीचे आकडे अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील निर्मितीमुळे निर्मिती क्षेत्राने यंदा वाढ नोंदविली आहे. भांडवली वस्तू क्षेत्राचा प्रवास मात्र सलग तिसऱ्या महिन्यात खालावला आहे.
दिपेन शाह, संशोधन प्रमुख, कोटक सिक्युरिटिज.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in production