ल्ल कोहिनूर शिक्षण संकुलात अलीकडेच कोहिनूर बिझनेस स्कूल, कोहिनूर मॅनेजमेंट स्कूल आणि कोहिनूर आयएमआय- स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थांचा २०१३ सालचा दीक्षान्त सोहळा पार पडला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी या निमित्ताने यशस्वितांचे मार्गदर्शन केले, तर कोहिनूर समूहाचे संस्थापक डॉ. मनोहर जोशी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कोहिनूर समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उन्मेष जोशी यांच्या प्रास्ताविकासह सुरू झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि विविध विद्याशाखांमधील विशेष प्रावीण्याबद्दल गौरविण्यात आले.
रामोजी फिल्मसिटीमध्ये नववर्ष सोहळा
ल्ल पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रामोजी फिल्मसिटीने यंदा नववर्षांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. २१ डिसेंबरपासून १६ दिवस चालणाऱ्या ‘हॉलिडे सेलिब्रेशन’अंतर्गत आनंदोत्सव, कॉर्निवल परेड, दररोज सायंकाळी लाईव्ह शो, राइड्स, इव्हिनिंग पार्टीदेखील योजण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत येथे विशेष व आकर्षक रोषणाईही करण्यात येणार आहे. कुटुंबासहित पर्यटन व निवास करू इच्छिणाऱ्यांसाठी काही पॅकेजही देऊ केले आहेत. ३० व ३१ डिसेंबर रोजी चित्रपट आदी विषयांवर विशेष कार्यक्रम होणार आहेत. तपशील http://www.ramojifilmcity.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘कोहिनूर’चा वार्षिक दीक्षान्त समारंभ
ल्ल कोहिनूर शिक्षण संकुलात अलीकडेच कोहिनूर बिझनेस स्कूल, कोहिनूर मॅनेजमेंट स्कूल आणि कोहिनूर आयएमआय- स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थांचा
First published on: 24-12-2013 at 08:48 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohinoor annual convocation ceremony