एसयुव्ही निर्मितीतील महिंद्र समूहाने सर्व वाहनांच्या किंमती अध्र्या टक्क्याने तातडीने वाढविण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. दरवाढीला समूहाच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी प्रविण शाह यांनी डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाचे कारण दिले आहे. यामुळे वाहनांच्या किंमती ३,००० ते ६,००० रुपयांनी वधारणार आहेत. महागडी एक्सयुव्ही५०० व रेक्सटॉन यांना मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. एक्सयुव्ही५०० ही कंपनीची आलिशान एसयुव्ही श्रेणीतील लोकप्रिय वाहन असून तिच्या पदार्पणातच प्रचंड प्रतिसाद लाभला होता. तर रेक्सटॉन हे महागडय़ा एस्युव्ही वाहन श्रेणीतील वाहन समूहाने कोरियन कंपनी त्याब्यात घेतल्यानंतर सादर केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-07-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra raises prices for some vehicles by 0 5 percent