तेजीच्या भांडवली बाजाराचा लाभ उठवत म्युच्युअल फंडांनी रोखे (डेट) बाजारात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ९ टक्के अधिक रक्कम गुंतविली आहे. फंड व्यवस्थापकांची रोखे बाजारातील २०१४-१५ मधील गुंतवणूक ६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहे, तर समभाग बाजारात फंडांची गुंतवणूक सरलेल्या आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फंड मालमत्ता ३ लाख कोटी रुपयांनी वाढत विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. वर्षभरात म्युच्युअल फंडांच्या एकूण गंगाजळीतील ३१ टक्के वाढ नोंदविली आहे. तुलनेत विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी डेट बाजारात १.६४ लाख कोटी रुपये निव्वळ गुंतवणूक केली आहे.