आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम म्हणून देशभरात गुरुवारपासून बिगरअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती तसेच हवाई इंधन दर कमी करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर तब्बल ४८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. वर्षांच्या मध्याला सर्वोच्च अशा प्रति पिंप १४० डॉलर असलेले दर डिसेंबरअखेपर्यंत ६० डॉलरच्याही खाली आले आहेत. तर मे २००९ नंतर ते किमान स्तरावर आले आहेत. सध्या ते गेल्या पाच वर्षांच्या तळाला आहेत.
बिगरअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त
बिगरअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो ग्रॅम) किमती गुरुवारी ४३.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या. नवी दिल्लीत आता सिलिंडर ७५२ रुपयांऐवजी ७०८.५० रुपयांना मिळेल. बिगरअनुदानित
हवाई इंधन दरात १२.५% कपात
विमानांसाठी आवश्यक असलेल्या हवाई इंधन दरांमध्ये १२.५ टक्क्यांची दर कपात करण्यात आली आहे. नवी दिल्लीत आता या इंधनाचा दर ५२,४२२.९२ रुपये प्रति किलो लिटर असेल. यंदा हे दर एकदम ७,५२०.५२ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. एप्रिल २००२ मध्ये हवाई इंधनाचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आल्यानंतरची ही सर्वात मोठी दर कपात आहे. गेल्या वर्षांतील ऑगस्टनंतरची ही सहावी दर कपात आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी प्रति किलो लिटर २,५९४.९३ रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. वाहन कंपन्यांना त्यांच्या एकूण खर्चापैकी इंधनासाठी ४० टक्क्यापर्यंतचा खर्च येतो. सध्या बिकट अर्थव्यवस्थेत असलेल्या वाहन कंपन्यांना यामुळे दिलासा मिळण्याची आशा आहे.