रिलायन्स कॅपिटल अॅसेट मॅनेजमेंटच्या नव्याने दाखल झालेल्या योजनेने गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळविला असून, प्रारंभीच १००० कोटींची गंगाजळी उभी केली आहे. आजवर समभागात गुंतवणूक असणाऱ्या मुदतबंद (क्लोज एंडेड इक्विटी फंड) योजनेने गोळा केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे.
रिलायन्स कॅपिटल बिल्डर फंड ।। या तीन वर्षे मुदत असलेल्या फंडासाठी ९ जानेवारी ते २३ जानेवारी २०१५ या दरम्यान गुंतवणुकीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. देशभरातून या फंडात गुंतवणुकीसाठी ५०,००० अर्ज आले आणि त्यातील निम्मे अर्ज हे (बी-१५ अर्थात अव्वल १५ शहरांपल्याडच्या) गुंतवणूकदारांकडून आले आणि त्यांची एकूण गुंतवणूक ही विक्रमी १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे रिलायन्स कॅपिटल अॅसेट ॉनेजमेंटचे मुख्याधिकारी संदीप सिक्का यांनी सांगितले.
शुद्ध मुदतबंद योजनेबाबत हा अभूतपूर्व अनुभव असून, यापूर्वी अलीकडेच म्हणजे सरलेल्या डिसेंबरमध्ये यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड-सिरीज ।। या मुदतबंद योजनेने सर्वाधिक ८९० कोटी रुपये गोळा केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘रिलायन्स’च्या फंड योजनेत विक्रमी गुंतवणूक
रिलायन्स कॅपिटल अॅसेट मॅनेजमेंटच्या नव्याने दाखल झालेल्या योजनेने गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळविला असून, प्रारंभीच १००० कोटींची गंगाजळी उभी केली आहे.
First published on: 30-01-2015 at 03:52 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance mf closed ended equity fund gets record rs 1k cr