यंदा जगभरात मंदीचे वातावरण असल्यामुळे देशातील उद्योग क्षेत्रात सरासरी १० टक्केच वेतनवाढ मिळणार असल्याचा अंदाज ‘एऑन ह्य़ूईट’ या जागतिक मनुष्यबळ क्षेत्रातील आघाडीच्या सल्लागार कंपनीने व्यक्त केला आह़े  गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी वेतनवाढ असणार आह़े
२०१३ या वर्षांत सरासरी १०.२ टक्के वेतनवाढ झाली होती़  तत्पूर्वी २००९ साली ही वाढ ६.६ टक्के इतकी होती़  या वर्षी कंपनीने उद्योग जगतातील केलेल्या पाचशे कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, भारतात कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के वेतनवाढ मिळणार आह़े  तसेच ही वाढ ८.८ ते १२ टक्क्यांपर्यंतच्या कमी अधिक होऊ शकते, असेही कंपनीचे म्हणणे आह़े
कंपनीच्या अहवालानुसार, २०१२ ते १४ ही वष्रे वेतनवाढीसाठी तितकीशी अनुकूल नव्हती़  विशेषत: गेल्या दशकाच्या तुलनेत ही वष्रे अगदीच किमान वेतनवाढ देणारी होती़  आर्थिक अस्थिरता, आर्थिक मंदी या पाश्र्वभूमीवर ही परिस्थिती उद्भवली आह़े
सध्या आर्थिक वाढ होताना दिसत असली, तरीही २००८ पूर्वीची परिस्थिती विचारात घेता, सध्याची आर्थिक वाढ अगदीच धीमी असल्याचे लक्षात येईल, असे कंपनीचे अधिकारी आनंदरूप घोसे यांनी सांगितल़े