नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी ४७ सदस्य असणाऱ्या समितीची सरकारने मंगळवारी घोषणा केली. ‘सहकारातून समृद्धी’ या ब्रीदाला अनुसरून नवीन सहकार धोरणाची आखणी केली जाईल, असे सहकार मंत्रालयाने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सहकार-सचिव आणि सहकारी संस्थांचे निबंधक आणि केंद्रीय मंत्रालय, विभागांचे अधिकारी, यांचा समावेश असलेल्या मसुदा समितीची केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच तयार केले जाईल ज्याता सर्वात तळाला असणाऱ्या प्राथमिक कृषी पतसंस्थांपासून वरच्या दिशेने सर्वसमावेशी दृष्टिकोन असेल, असे शहा यांनी अलीकडेच जाहीर केले होते. सहकारविषयक विद्यमान राष्ट्रीय धोरण २००२ मध्ये तयार करण्यात आले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu appoint head panel to draft national cooperation policy zws