एखाद्या क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या कंपनीच्या बाबतीत चांगली गोष्ट घडल्यास त्याचे पडसाद इतर कंपन्यांच्या मूल्यांकनावर उमटतात. युनायटेड स्पिरिट व जेट एअरवेज या कंपन्यांनी आपले शेअर अधिमूल्याने विक्री करताच या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे मूल्यांकन वाढले. िहदुस्तान युनिलीव्हरच्या मातृकंपनीने भारतातील आपल्या उपकंपनीमधील हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी अधिमूल्य देऊन शेअर खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा या क्षेत्रातील इतर कंपन्यांना निश्चितच होईल..
सौंदर्यखाणी, सुनया विमला सुशीला
विद्याविभूषित गुणी अशि मुग्धबाला
दैवेची हो गतधवा जरी ती जनास
आहे मनोहर तरी गमते उदास
आज अक्षय्य तृतीया. आजच्या दिवशी खरोखरी खरेदी करावे काय अशी एकूण परिस्थिती आहे. Sell in May and go away हे वाक्य बाजारातल्या जुन्या जाणकारांकडून नेहमी ऐकायला मिळते. मे महिन्यात बाजारात कधी तेजी नसते असा या वाक्याचा मथितार्थ आहे. या वर्षीचा मे महिना याला अपवाद ठरला. मे
मागील मे महिन्यात गुंतवणुकीचा कायम भाग असावा (Perpetual Buy) अशा १२ कंपन्यांचे विवेचन केले होते. या कंपन्यांतील आठ कंपन्या एफएमसीजी क्षेत्रातील होत्या. या १२ कंपन्यांनी सरासरी ३२% परतावा एका वर्षांत दिला आहे. राजकीय अस्थिरता, लोकसभेच्या निवडणुकांचे लागलेले वेध, नवीन खरेदीस पोषक नसलेली आर्थिक मोजमापे जगातील प्रमुख बाजारांचे निर्देशांक २००८च्या आर्थिक अरिष्टाच्या आधीच्या पातळीवर असणे या परिस्थितीत, सुरक्षित वाटावी अशी गुंतवणूक ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) क्षेत्राशिवाय दुसरी दिसत नाही. म्हणून या क्षेत्रातील निवडक कंपन्यांचा आढावा घेऊ. लेखनाची मर्यादा लक्षात घेऊन दोन कंपन्या आज भेटीला आणल्या तरी कोलगेट, नेस्ले, इमामी, डाबर, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजिन, जिलेट, टाटा ग्लोबल बीव्हरेजेस अशा कितीतरी कंपन्या खुणावत आहेत. यथावकाश सवड मिळाली तर त्यांना अवश्य भेटू.
टायगर, ५०:५०, लिटिल हार्ट, मारी गोल्ड, ट्रीट, न्यूट्रीचॉइस, बोरबॉन यासारख्या साखळी नाममुद्रांची मालकी ब्रिटानिया इंडस्ट्रीज या कंपनीकडे आहे. ब्रिटानियाने आपला व्यवसाय चार प्रकारांत विभागला आहे. चीज, पावावर लावायचे लोणी, दूध भुकटी, दही हे दुग्धजन्य पदार्थ, केक व बिस्किटे, पाव ही बेकरी उत्पादने व निर्यातप्रधान उत्पादने हे चार प्रकार आहेत. भारतात नाममुद्रांकित बिस्कीट व्यवसाय ३५%ने वाढत
आता महिन्याभरात शाळा सुरू होतील. एव्हाना शाळेचा गणवेश पुस्तके यांची खरेदी झाली असेल. अजून रेनकोट छत्रीच्या खरेदीच्या बरोबरीने पावसाळी पादत्राणांची खरेदीही बाकी असेल. कधी काळी पादत्राणे म्हटले की ‘बाटा’ ही नाममुद्रा डोळ्यापुढे येते. बाटा ही कंपनी पादत्राणाची सर्वात मोठी उत्पादक असून स्वस्त पादत्राणापासून ‘स्पोर्टस्टार’, ‘हष पपीज’ ‘नॉर्थ स्टार’सारख्या महाग पादत्राणांपर्यंत उत्पादनाची तिची साखळी आहे. कंपनीचा कारखाना कोलकाता शहरातील औद्योगिक विभागात आहे. हा परिसर ‘बाटानगर’ नावाने ओळखला जातो. या परिसराचे क्षेत्रफळ २६८ एकर आहे. परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी बाटा इंडियाने एक स्वतंत्र कंपनी कोलकाता महानगरपालिकेबरोबर संयुक्तपणे स्थापली आहे. येत्या तीन वर्षांत काम पूर्णत्वाला जाईल जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून बाटा आणखी विक्री दालने उघडू शकेल. वाढते नागरीकरण, बदलती जीवनशैली यांचा फायदा बाटाला विक्री वाढण्यात झाला आहे. उदाहरण द्यायचे तर आजच्या लहान मुलांकडे शाळेच्या गणवेशावर घालायचे बुटांचे दोन जोड (एक काळा व एक खेळायचा), एक चप्पल, एखादा समारंभासाठी घालायचा जोड असतो. भारतातील कंपनीची चामडे प्रक्रिया करण्याची मोठी क्षमता असल्याने मातृकंपनीची गरज भारतातील या उपकंपनीकडून पूर्ण होते. भारतातून ३७% उत्पादन युरोपात मातृकंपनीला निर्यात होते. बाटाचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असल्याने २०१३च्या पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या तिमाहीची विक्री १२%ने वाढून ४५४ कोटी झाली तर नफा ७% वाढून ३८ कोटी झाला आहे. युरोपातील आर्थिक अरिष्टाचा परिणाम युरोपातील निर्यात कमी होण्यात झाली झाली. चालू तिमाहीत युरोपातील निर्यातीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. वर्षभरात ८६०-८७५ दरम्यान भाव दिसावा अशी अपेक्षा आहे.
बाटा इंडिया
दर्शनी मूल्य रु. १०/-
एका वर्षांतील उच्चांक रु. ९८९
एका वर्षांतील नीचांक रु. ६८८
सद्य बाजारभाव रु. ८०९
(१०मे २०१३ रोजी)
ब्रिटानिया इंडस्ट्रीज
दर्शनी मूल्य रु. २/-
एका वर्षांतील उच्चांक रु. ५९५
एका वर्षांतील नीचांक रु. ४००
सद्य बाजारभाव रु. ५७१.०५ (१०मे)