Mahalakshmi Rajyog In Kundali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वैभव कारक ग्रह शुक्र १८ जानेवारीला धनु राशीत प्रवेश करणार आहे तर या राशीत अगोदरच बुध ग्रहाचे गोचर झाले आहे. बुध व शुक्राच्या युतीने अत्यंत महत्त्वाची व शुभ मानले जाणारे काही राजयोग तयार होत आहेत. यातील तीन महत्त्वाचे योग हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारे आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार त्रिगही राजयोग, महालक्ष्मी राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोग हे काही राशींमध्ये निर्माण होत असून अशी स्थिती तब्बल १० वर्षांनी जुळून आली आहे. यामुळे प्रभावित राशींना चहुबाजूने पैशांचा पाऊस अनुभवता येऊ शकतो. इतकेच नाही तर सुखाचे दिवस सुरु करून हा राजयोग आपल्याला तन-मन – धनाने समृद्ध करू शकतो. महालक्ष्मी राजयोग जुळून आल्याने नवीन वर्षात काही राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यात तुमचा समावेश आहे का हे तपासून पाहूया..
लक्ष्मीकृपेने ‘या’ राशी तन- मन- धनाने होतील समृद्ध
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या नवव्या स्थानी शुक्राचे गोचर होत आहे. अशावेळी आपली अडकून पडलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. परिणामी आपल्याला अडकून पडलेले धन सुद्धा मिळू शकते. अचानक झालेल्या या धनलाभामुळे समाजातील स्थान आणखी भक्कम होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या निमित्ताने परदेश वारी होऊ शकते. शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जातो त्यामुळे तुमच्या प्रेमाच्या नात्यांना एक मजबुती देण्याचे काम शुक्रदेव करू शकतात. नात्यांची नव्याने ओळख होईल, तुम्ही प्रेमाने जोडलेली माणसे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणू शकतात.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
शुक्राने आपल्याच राशीत महालक्ष्मी राजयोग बनवला असल्याने नवे करार, कागदपत्रे यांच्यासाठी उत्तम ग्रहयोग आहे. स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लावाल. व्यवहार फायदेशीर होईल. नोकरी व्यवसायात नवे विचार , संकल्पना अमलात आणण्यासाठी उत्तम आखणी करावी. धरसोडपणा नको. विद्यार्थी वर्गाने उभारी घेऊन कंबर कसली तर यश आपलेच आहे. जोडीदारासह सूर छान जुळतील. आंधळेपणाने पैसा, प्रसिद्धीच्या मागे धावू नका. अविवाहित मंडळींना लग्नाचे योग आहेत. स्वतःच्या व्यवसायात किंवा प्रगतीसाठी आणखी जोमाने प्रयत्न करा.
हे ही वाचा << लक्ष्मी नारायण येती घरा! बुध शुक्र युतीमुळे ‘या’ राशीचे लोकांना लाभेल कोट्यधीशांचे नशीब; कसा होईल लाभ?
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
शुक्र ग्रह आपल्या राशीच्या धन भावात भ्रमण करत आहे परिणामी येत्या काळात पैशाची कमतरता पूर्णपणे दूर होऊ शकते. महालक्ष्मी राजयोग तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच कामाची मोठी संधी चालून येऊ शकते. संभाषण कौशल्यावर थोडे काम केल्यास येत्या काळात वाणीच्या माध्यमातून आपल्याला खूप लाभ होऊ शकतो. जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरू शकते. नवी नाती जोडता येतील ज्यांच्या रूपात अडकून पडलेल्या, रखडलेल्या कामांना उत्तर मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)