Aajche Rashi Bhavishya In Marathi , 19 May 2025 In Marathi : १९ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी सोमवारी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत राहील. मंगळवारी ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत ब्रह्म योग त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत रवि योग जुळून येईल. संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीची आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

१९ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 19 May 2025)

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळपघळ गप्पा मारल्या जातील.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. चोरांपासून सावध रहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. कमिशन मधून मिळणार्‍या लाभाचा फायदा घ्या. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. अती अपेक्षा ठेवू नका.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

कामात वडि‍लांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. नसते धाडस अंगाशी येवू शकते. कामातील चिकाटी सोडू नये. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देवू नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)

जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. जुगार खेळताना सावध रहा. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. हाता पायाला किरकोळ इजा संभवते.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. काटकसरीवर भर द्यावा लागेल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे घ्यावीत. प्रेम सौख्यात वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जुगाराची आवड जोपासली जाईल. अधिकाराची जाणीव ठेवून वागा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 may 2025 horoscope today daily astrology aajche rashi bhavishya todays rashifal in marathi vnk 50 asp