4th April 2024 Panchang & Horoscope: ४ एप्रिल २०२४ ला फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. आजच्या दिवशी श्रवण नक्षत्रात सिद्ध योग असणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. तर १ वाजून ५८ मिनिटांपासून ते ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. आज चंद्र मकर राशीत असणार आहे. आजचा गुरुवार कोणत्या राशीला शुभ सिद्ध होईल, मेष ते मीन राशीचे नशीब कसे बदलेल याविषयी जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ एप्रिल २०२४ पंचांग व राशी भविष्य

मेष:-कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधि उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट छान नि करावी. आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.

वृषभ:-प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसे खातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल.

मिथुन:-अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.

कर्क:-जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.

सिंह:-कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.

कन्या:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.

तूळ:-तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.

वृश्चिक:-एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.

धनू:-दिवस मना प्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.

मकर:-उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.

कुंभ:-आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.

हे ही वाचा<< ३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत

मीन:-गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th april panchang rashi bhavishya guruvaar shravan nakshatra mesh to meen zodiac signs money health marathi astology today svs