Wealthy Mulak: अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल हेसुद्धा तुम्ही अगदी सहज जाणून घेऊ शकता. तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. या मूलांकानुसार व्यक्तीचे वर्तमान आणि भविष्य आणि त्याच्या स्वभावातील गुण-अवगुण, आवड, करिअर या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मूलांकाबद्दल सांगणार आहोत, ज्या मूलांकाच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची अखंड कृपा असते.

मूलांक ६ वर असतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

प्रत्येक मूलांकावर एका ठराविक ग्रहाचा आणि देवी-देवातांचा आशीर्वाद असतो. मूलांक ६ म्हणजेच ज्या व्यक्तींची जन्मतारीख ६, १५ किंवा २४ असते, अशा व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो. शुक्र ग्रहाला आकर्षण, भौतिक सुख, कला, समृद्धी, संपत्तीचा कारक ग्रह मानले जाते. शिवाय हा मूलांक असणाऱ्यांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे या व्यक्तींना आयुष्यात कधीही पैसा, भौतिक सुखाची कमतरता भासत नाही.

२०२५ वर्ष मूलांक ६ ला कसे जाणार?

२०२५ साल म्हणजे २+०+२+५ = ९ अंकाबरोबर सहा अंकाचा वर्षभर प्रवास असणार आहे, त्यामुळे मंगळातील शूरता, साहस यांच्या स्वभावात येईल; पण त्यांचा त्यांनी दुरुपयोग करू नये. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी फटकळपणे वागू नये. नाती जपावीत मात्र अन्याय, फसवणूक या विरोधात मंगळाची मदत घेऊन नक्कीच समोरच्याला आपली हिंमत दाखवावी.

फॅशन कलाकार, सौंदर्य प्रसाधने यांचा व्यवसाय शुक्र मंगळाच्या साहाय्याने उत्तम चालेल. भावनिक स्तरावर कोणतीही नाती निर्माण करू नये. प्रेमविवाहात निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सट्टा, रेस गैरमार्गाने पैसा कमावण्याच्या उद्योगधंद्यात भाग घेऊ नये. नको त्या अमिषाला बळी पडून दुप्पट पैसा अशा योजनांना बळी पडू नये.