Rashi Bhavishya In Marathi, 7 May 2025 : ७ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी १० वाजून २० मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर एकादशी सुरु होईल. फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत जागृत असेल. रवी योग संध्याकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १:३० पर्यंत असणार आहे. तर मेष ते मीन राशींच्या नशिबात नेमकं आज काय लिहून ठेवलंय हे पाहूया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

७ मे पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 7 May 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 may 2025 rashi bhavishya todays horoscope predictions for all 12 zodiac signs in marathi asp