7th April 2024 Marathi Horoscope: ७ एप्रिल २०२४ ला एप्रिल महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीची आजची तिथी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात उजळून निघणार आहे. या दिवसाला ब्रम्ह योगाचा शुभ मुहूर्त लाभला असून आजच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून ६ मिनिटांपासून ते ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहुकाळ कायम असणार आहे. चंद्रमा आजच्या दिवशी मीन राशीत विराजमान असेल. आजचा दिवस १२ पैकी कोणत्या राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो, कुणाला भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो याचा ज्योतिषीय अनुषंगाने आढावा पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ एप्रिल पंचांग: ‘या’ राशींवर ब्रम्ह योगात आज बरसेल महादेवाची कृपा

मेष:-सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.

वृषभ:-धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.

मिथुन:-काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

कर्क:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.

सिंह:-व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्‍यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कन्या:-मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.

तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण अजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अती घाई उपयोगाची नाही.

वृश्चिक:-स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू:-हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

मकर:-काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.

मीन:-नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7th april panchang masik shivratri bramha yog mesh to meen daily horoscope today this rashi will earn money luck shine like nakshtra svs