Horoscope Today In Marathi, 8 June 2025 : ८ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सोमवारी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत परिघ योग जुळून येईल. दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असेल . राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज त्रिदिनात्मक सावित्री व्रतारंभ होणार आहे. तर आज स्वाती नक्षत्रात तुमच्या आयुष्यात काय चांगले बदल होणार जाणून घेऊ…

८ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Daily Horoscope In Marathi, 8 June 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधी सोडू नका. नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका. प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

आत्मसंयमन करावे लागेल. अति धाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते. जोडीदारा सोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर