Laxmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध वाणी, व्यापार, बुद्धीचा कारक ग्रह आहे. तसेच शुक्र ग्रहाला धन, वैभव, ऐश्वर्य आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानले जाते. २७ फेब्रुवारी रोजी मीन राशीमध्ये बुध आणि शुक्र ग्रहाची युती ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण करत आहे. ज्यामुळे १२ राशीतील काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या योगाच्या शुभ प्रभावाने भाग्यशाली राशींना आकस्मिक धनलाभ, प्रत्येक कामात यश मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

कुंभ

बुध आणि शुक्र ग्रहाची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 24 hours budh and shukra create lakshmi narayan yoga in meen rashi three zodics get increase bank balance and success in every field sap