वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि त्यांची शुभ दृष्टी राशींवर टाकतात. त्यामुळे याचा प्रभाव काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. अशातच आता देवगुरु बृहस्पती नवम शुभ दृष्टी देत असून ते मेष राशीत भ्रमण करत आहेत. तसेच मेष राशीतून नवम स्थानी धनु आहे आणि धनु राशीवर गुरुचे राज्य आहे, त्यामुळे या काळात ३ राशींना अचानक धन आणि भाग्याचा योग बनत आहे. तर त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मेष –
गुरूची नवम दृष्टी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मेष राशीपासून नवम स्थानी धनु राशी आहे आणि ते भाग्याचे स्थान आहे. म्हणूनच गुरू तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यशाली स्थानी गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे या काळात नशीबाची साथ मिळू शकते. यासोबतच तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही या काळात तुम्ही प्रवास करू शकता. त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. ते कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात.
मिथुन –
गुरुची नवम दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत गुरूचे स्थान सातवे आहे. त्यामुळे यावेळी तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. तसेच, या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकतो किंवा तुम्ही भागीदारीचे काम सुरू करू शकता. जे अविवाहित आहेत त्यांना लग्न प्रस्ताव येऊ शकतात. तसेच या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.
हेही वाचा- चार महिन्यात ‘या’ तारखांना मुसळधार पाऊस बरसणार? नक्षत्रांनुसार जाणून घ्या पावसाची भविष्यवाणी
सिंह –
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूची नवम दृष्टी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण गुरु ग्रहाची सूर्यदेवाशी मैत्री आहे. यासोबतच गुरु भाग्य स्थानावर विराजमान आहेत. त्याचवेळी त्याची दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला संतानसुख मिळू शकते. यासोबतच मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. दुसरीकडे, जे विचारवंत, कथाकार, ज्योतिषी किंवा धार्मिक कार्याशी संबंधित आहेत, त्यांना या काळात चांगले लाभ मिळू शकतो.