June Vinayak Chaturthi, Aajche Rashi Bhavishya In Marathi: २८ जून २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. आज सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जुळून येणार आहे. सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत हर्षण योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज विनायक चतुर्थी सुद्धा असणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी २७ जून रोजी शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. तर २८ जून रोजी शनिवारी मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वर्षी आषाढ विनायक चतुर्थी आज २८ जून २०२५ रोजी असणार आहे. तर ही आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी तुमच्यासाठी कशी खास ठरेल जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

२८ जून २०२५ आजचे राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 28 June 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा. हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा. लेखन क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान लाभेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadha vinayak chaturthi aajche rashi bhavishya 28 june 2025 mesh to meen zodiac sign daily horoscope in marathi vnk 50 asp