Nostradamus Predictions for 2023: फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिषी नास्त्रोदमस यांनी शंभर वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहून जगाविषयी अनेक भाकिते केली. आश्चर्य म्हणजे यातील काही भविष्यवाण्या या वेळोवेळी खऱ्या झाल्या आहेत. नास्त्रोदमस यांचा जन्म, दक्षिण फ्रान्स येथे १४ डिसेंबर १५०३ रोजी झाला होता आणि ते प्रसिद्ध फ्रेंच चिकित्सक, कॅबलिस्ट आणि फार्मासिस्ट होते नास्त्रोदमस यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. नास्त्रोदमसने वर्ष ३७९७ पर्यंतच्या ६३३८ भविष्यवाण्या लिहिल्या आहेत. २०२३ हे नवीन वर्ष कसे जाणार याविषयीही नास्त्रोदमसने खास उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

2023 साठी केलेल्या नास्त्रोदमसच्या काही भविष्यवाण्या येथे पाहा:

महायुद्ध

नास्त्रोदमस यांनी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली आहे. या महायुद्धाने जगभरावर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे माणूस माणसाच्या जीवावर उठेल असेही नास्त्रोदमस यांनी सांगितले आहे.

मंगळावर जीवन

मंगळावर जीवन स्थापन करण्याच्या मार्गाने काही विशेष पाऊलं उचलली जातील. तसेच नास्त्रोदमसच्या भविष्यवाणीत लिहिले आहे की, “रॉयल इमारतीवर खगोलीय आग” लागू शकते म्हणजे याचा अर्थ असा आहे की, सभ्यतेच्या राखेतून एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल.

श्रीमंत विरुद्ध गरीब संघर्ष

हे भाकीत असे सूचित करते की लोक घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात लढा देत असल्याने श्रीमंतांविरुद्ध उठाव होऊ शकतो. हे बंडच तिसऱ्या शकते.

हे ही वाचा<< २०२३ एप्रिल पर्यंत ‘या’ ३ राशींना बक्कळ धनलाभाची संधी; शनिदेव व गुरु एकत्र देऊ शकतात प्रचंड श्रीमंती

युती होणार

महाराष्ट्राच नव्हे भारतात नव्हे तर जगभरात दोन महाशक्तींची युती होणार आहे हे नास्त्रोदमसच्या भविष्यवाणीमधून सूचित होत आहे. या महाशक्तीची निर्मिती विनाशकारी कारणांमधून होऊ शकते पण हेतू भ्रष्ट असल्याने त्यांना कितपत यश लाभेल यावर प्रश्नचिन्ह आहे.

(टीप: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology predictions nostradamus baba venga 2023 who will get money will there be political third world war check here svs