Budh Vakri 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. त्यातबरोबर ग्रहांचा अस्त, उदय होतो शिवाय ते उलटी चाल देखील चालतात. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, १५ मार्च रोजी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह मीन राशीत उलटी चाल चालेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशी होणार मालामाल

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाची उलटी चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

धनु

बुध ग्रहाची उलटी चाल धनु राशीच्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आयुष्यात आनंद निर्माण होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाची उलटी चाल आयुष्यात आनंदी आनंद घेऊन येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील.कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh gochar 25 the three zodiac signs will get happy life and earn lots off money sap