Budh Nakshatra Gochar 2025: हिंदू धर्मात देव दिवाळीला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. तर भारतातील काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, यंदा महाराष्ट्रात साजरी केली जाणारी देव दिपावली २१ नोव्हेंबर २०२५ रोजी असून या दिवशी ज्योतिष शास्त्रातील बुद्धी, विद्या आणि वाणीचा कारक ग्रह बुध नक्षत्र गोचर करेल. त्यामुळे हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातूनही खूप खास मानला जाईल.

पंचांगानुसार, बुध ग्रह २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून ०८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह असून बुधाचे या नक्षत्रातील गोचर काही राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरू शकते.

बुधाचे नक्षत्र परिवर्तन भरपरू यश देणार

मिथुन (Mithun Rashi)

या राशीच्या व्यक्तींना बुधाचे नक्षत्र गोचर मालामाल करेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे गोचर फायदेशीर ठरेल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश-कीर्ती, वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल, कर्ज फिटण्यास मदत होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)