Trigrahi Yog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रह प्रवेश करतात, ज्यामुळे ग्रहांची युती निर्माण होते. या युतीचा अनेकदा शुभ तर अनेकदा अशुभ प्रभाव देखील पडतो. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असून नव्या वर्षात अनेक ग्रहांचे गोचर पाहायला मिळेल. वर्षाच्या सुरूवातीलाच सूर्य, शुक्र आणि बुध एकाच राशीत येतील ज्यामुळे त्रिग्रही राजयोग निर्माण होईल.

पंचांगानुसार, १३ जानेवारी २०२५ रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे, याच दिवशी १३ जानेवारी २०२६ रोजी बुधदेखील मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि १४ जानेवारी २०२६ रोजी सूर्य देखील याच राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मकर राशीमध्ये त्रिग्रही राजयोग निर्माण होईल. २०२६ मध्ये निर्माण झालेला हा पहिला त्रिग्रही राजयोग असेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

त्रिग्रही योग देणार प्रत्येक क्षेत्रात यश

मिथुन (Mithun Rashi)

त्रिग्रही योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील.

तूळ (Tula Rashi)

त्रिग्रही योग तूळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. आरोग्य समस्या दूर होतील.

सिंह (Singh Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)