Budh Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे बुधदेखील एका राशीतून दुसऱ्या राशीत त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन किंवा वक्री, मार्गी, उदय अवस्थेत प्रवेश करतो. यंदा १४ मार्च धुलिवंदन साजरे केले जाईल. धुलिवंदनाच्या दुसऱ्याच दिवशी १५ मार्च रोजी बुध ग्रह वक्री होईल. बुधाची ही चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन राशींची होणार चांदी

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनाही बुधाच्या वक्री चाल शुभ परिणाम देईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

कुंभ

बुध ग्रहाची वक्री चाल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh vakri 25 three zodiac signs will be happy sap