Budhaditya Rajyog In Kanya: ज्योतिषशास्त्रात अनेकदा ग्रहांच्या युतीमुळे विशेष योग निर्माण होतात, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना अचानक यश, पैसा व कीर्ती मिळते. येत्या १७ सप्टेंबरला सूर्यदेव कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. तेथे त्यांची युती बुध ग्रहासोबत होणार असून, या दोन ग्रहांच्या मिलनातून बुधादित्य राजयोग तयार होईल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि राशिचक्रातील काही निवडक राशींच्या लोकांना प्रचंड लाभ देतो. मग कोणत्या आहेत त्या राशींच्या लोकांना आणि काय मिळणार त्यांना, चला जाणून घेऊया…

कोणत्या राशींना मिळणार अचानक श्रीमंती? बुधादित्य योग देणार मोठं सुख

वृषभ

बुधादित्य योगाच्या निर्मितीने वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. काहींना या काळात हवीहवीशी नोकरी मिळू शकते. त्यांना कार्यकुशलतेमुळे धनलाभ होईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मोठं यश गाठता येऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्येही चांगली कामगिरी करता येईल. भावनात्मकदृष्ट्या तुम्ही सशक्त राहाल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल. आरोग्यातही चांगले बदल जाणवतील.

वृश्चिक

या काळात वृश्चिक राशीच्या लाभ भावात सूर्य-बुधाची युती होत असल्यानं नक्कीच फायद्याचे दिवस सुरू होणार आहेत. करिअर आणि व्यवसायात नफा होऊ शकतो, अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काही जणांना स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. या काळात प्रवासाची शक्यता असून, तो प्रवास यशदायी ठरेल. सरकारी नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जमा-संचित धनात वाढ होईल आणि आर्थिक बळकटी मिळेल.

धनू

बुधादित्य योग धनू राशीच्या कर्म भावात तयार होणार आहे. हा योग तुमच्या कार्यांना गती देईल. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कर्ज आणि पैशांशी संबंधित अडचणी सुटतील. दिलेला पैसा परत मिळू शकतात. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. काहींच्या बाबतीत परदेशी जाण्याचाही योग येऊ शकतो. आरोग्य सुधारेल आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करता येतील.

म्हणजेच १७ सप्टेंबरचा दिवस या तीन राशींसाठी सोन्याची संधी घेऊन येतोय. अचानक येणाऱ्या या राजयोगामुळे भाग्य द्वार उघडले जाणार आहे आणि जीवनात प्रगतीच्या नव्या वाटा समोर येणार आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)