Chanakya Quotes Marathi : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असेही म्हणतात. त्यांचा जन्म सुमारे ३ हजार वर्षांपूर्वी झाला. ते प्राचीन भारतातील एक महान तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि रणनीतीकार होते. ते मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे मार्गदर्शक आणि गुरू होते. त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे अर्थशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, शासन आणि युद्ध नीतिमत्तेवर एक व्यापक ग्रंथ. त्यांचे शब्द शेकडो वर्षांनंतरही प्रासंगिक आहेत. या पुस्तकात चाणक्य म्हणतात की,”घरात राहणाऱ्या अशा ४ लोकांपासून सावध राहा, ज्यांच्यापासून वेळीच दूर केले नाही तर जीवन मृत्यूसारखे होते. चला जाणून घेऊया ते ४ लोक कोण आहेत.

कोणत्या स्त्रिया जिवंतपणे आयुष्य नर्कासारखे बनवतात?

आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या घरामध्ये दुष्ट स्त्रिया असतात जिथे, घरातील कर्ता पुरूषाचे जीवन मृत्यूसमान होते. त्यामुळे त्यांच्या घरात त्याला कोणी विचारत नाही. त्यांचे कोणी ऐकत नाही आणि ते मनातील मनात कुढत राहतात आणि मृत्यूच्या दिशेने सरकतात.

आपण कोणत्या प्रकारच्या मित्रांवर विश्वास ठेवावा?

चाणक्य नीतिनुसार, जर तुमच्या मित्रांपैकी एखाद्याचा स्वभाव वाईट असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तो तुम्हाला कधी विश्वासघात करेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून, अशा मित्रापासून शक्य तितक्या दूर राहा.
अशा कर्मचाऱ्यांना लवकर काढून टाकणे चांगले.

अशा कर्मचाऱ्यांना लवकर काढून टाकणे चांगले.

ते म्हणतात की जो कोणी तुमच्याहाताखाली काम करणारा माणूस जर तुम्हाला कधी उलट उत्तर देत असेल तर तो तुम्हाला असह्य नुकसान पोहोचवू शकतो. अशा नोकराबरोबप राहणे म्हणजे नेहमीच अविश्वासाचा घोट घेण्यासारखे असते.

ज्या घरात या प्राण्याचा वावर आहे तिथे राहणे धोकादायक आहे.

चाणक्य इशारा देतात की, जर एखाद्या घरात सापांचा वावर असेल तर तिथे राहणे धोकादायक आहे. कधी कोणी सर्पदंशाचा बळी होईल सांगता येत नाही अशा परिस्थितीत त्या प्राण्यापासून आणि घरापासून वेळीच दूर जावे अन्यथा जीव जाऊ शकतो.