Gajkesari Rajyog In Kark Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. चंद्र जेव्हा गुरू ग्रहाबरोबर युती निर्माण करतो तेव्हा गजकेसरी राजयोग निर्माण होतो. या योगाला अत्यंत प्रभावी आणि शुभ मानले जाते.

पंचांगानुसार, गुरू ग्रह १८ ऑक्टोबर रोजी ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून तो या राशीत ५ डिसेंबरपर्यंत असेल. याचदरम्यान, १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ०२ मिनिटांनी चंद्रदेखील कर्क राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे कर्क राशीत गजकेसरी राजयोग निर्माण होईल. हा योग १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकवण्यास मदत मिळेल.

गजकेसरी राजयोग देणार पदोपदी यश

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरेल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)