Moon Transit 2025:  वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलत असतात. एका ठराविक वेळेनंतर हे ग्रह बारा राशीत भ्रमण करत असतात. शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळासाठी एका राशीत असतो. त्यानंतर तो दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. ज्योतिषशास्त्रात चंद्र देवाचे म्हणजेच उपग्रहाचे विशेष स्थान आहे. हा ग्रह सर्वात लवकर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो. चंद्र प्रत्येक राशीमध्ये फक्त दीड दिवस विराजमान असतो आणि मग तो राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो. वैदिक पंचांगानुसार, गुरुवार, १ मे रोजी पहाटे ३:१४ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत काही राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात…

‘या’ राशींचे पालटणार नशीब?

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळू शकतात. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकते. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. 

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे भ्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या दीर्घकाळ दडपलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल अनुभवता येऊ शकतात. नोकरी करणारे लोक आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला यश मिळू शकते. तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते. सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहू शकतो. समाजात मान सन्मान मिळू शकतो.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. या काळात तुम्हाला शैक्षणिक कार्यात यश मिळू शकतो. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळू शकते. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ मिळू शकते. आयुष्यात सुख-समृद्धी वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)