Ketu Nakshatra Pada Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन आणि नक्षत्र पद गोचरही करतो. पंचांगानुसार, केतूचे २३ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ०३ मिनिटांनी पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करेल. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर विशेष पाहायला मिळेल. शिवाय या काळात दिवाळी देखील आहे. ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रकारे पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींना येणार सुखाचे दिवस
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र पद गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे नक्षत्र पद गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र पद परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. फक्त मेहनत कायम ठेवा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)