Rashi Bhavishya In Marathi, 20 May 2025 : २० मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर अष्टमी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमणे आज कालाष्टमी सुद्धा असणार आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत साजरे केले जाते. या दिवशी काळभैरवाची पूजा करण्याची परंपरा आहे. तर तुमच्या राशीसाठी कालाष्टमी काय घेऊन येणार जाणून घेऊया…
२० मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya, 20 May 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope in Marathi)
दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope in Marathi)
कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope in Marathi)
मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope in Marathi)
कौटुंबिक स्थैर्याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope in Marathi)
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope in Marathi)
मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope in Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope in Marathi)
जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope in Marathi)
जवळचा प्रवास सावधानतेने करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope in Marathi)
नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope in Marathi)
आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope in Marathi)
सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd