- मेष:-
जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. वैवाहिक सौख्यकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भागिदाराशी समजुतीने वागावे. चारचौघात भडक मत प्रदर्शित करू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. - वृषभ:-
उगाचच चिडचिड करू नये. इतरांच्या वागण्याचा फार विचार करत बसू नये. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. जिद्दीने कामे पार पडाल. - मिथुन:-
गोष्टी वेळेवर करण्यावर भर द्यावा. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात कटकट निर्माण होऊ शकते. नातेवाईकांशी वाद घालू नयेत. मित्रांची बाजू समजून घ्यावी. - कर्क:-
कौटुंबिक गोष्टी चिघळू देऊ नयेत. घरातील वातावरण शांत ठेवावे. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांचे धोरण कडक राहू शकते. संयम बाळगावा लागेल. - सिंह:-
हातापयास किरकोळ इजा होऊ शकते. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. काही अनावश्यक खर्च टाळावेत. हिमतीच्या बळावर कामे हाती घ्याल. कर्तबगारीला वाव आहे. - कन्या:-
स्वभावात उधळेपणा येऊ शकतो. योग्य नियोजनाशिवाय पर्याय नाही. मागचा-पुढचा विचार करावा लागेल. गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे. - तूळ:-
फार हट्टीपणा करू नका. कार्यक्षमता वाढीस लागेल. क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज वाढू शकतात. कामातील अडचणी प्रयत्नाने दूर कराव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. - वृश्चिक:-
मनाची अवस्था चंचल राहील. ध्यानधारणा करण्यात वेळ व्यतीत करावा. उगाच सगळ्या गोष्टीत लक्ष घालत बसू नका. सामाजिक बांधिलकी जपावी. वादाच्या प्रसंगांपासून दूर राहावे. - धनु:-
नवीन कामात अपेक्षित यश मिळेल. तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. अंगीभूत कलेचा प्रसार करता येईल. मनातील भावना उत्तम प्रकारे मांडू शकाल. - मकर:-
घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. क्षुल्लक गोष्टींवर फार चर्चा करू नका. जुन्या गोष्टींचा मनावर ताण घेऊ नका. चैनीत वेळ घालवाल. क्षणिक सौख्य लाभ होईल. - कुंभ:-
मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळेल. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात सावधगिरी बाळगावी. कामाची नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. - मीन:-
पोटाचे त्रास उदभवू शकतात. आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात वाढ करता येईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 25-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 25 november 2019 aau