मेष

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज महत्त्वाचे निर्णय एकट्याने घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामाचा पाठपुरावा करावा. वरिष्ठांची मर्जी राहील त्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम हरये नमः हा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. महादेव मंदिरामध्ये दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराव्यात. नवीन आर्थिक योजना राबविण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. व्यवसायात प्रगती कराल. कालभैरवाची उपासना करणे.
आजचा रंग – निळा

सिंह

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी चांगला दिवस. व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम हरये नमः जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामाचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय जपून घ्यावे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, महत्त्वाच्या कामांसाठी आजचा दिवस चांगला. व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे
आजचा रंग – गुलाबी

धनु

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यवसायांसाठी, मोठ्या निर्णयासाठी चांगला दिवस, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. इंद्राग्निभ्यां नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा.

मकर

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. कुलदैवतेचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वांच्या कामांसाठी नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – जांभळा

मीन

वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. उलाढाली जपून कराव्यात. कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन घेणे.
आजचा रंग – जांभळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 22 janaury