Horoscope Today in Marathi, 25 June 2025 : २५ जून २०२५ रोजी जेष्ठ दुपारी शुक्ल पक्षातील अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथी संध्याकाळी ४ वाजून २ मिनिटांपर्यंत राहील. रात्री २ वाजून ३९ मिनिटांपर्यंत वृद्धि योग जुळून येईल. सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत मृगाशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज दर्श अमावस्या असणार आहे. आजची अमावस्या तुमच्या राशीसाठी काय घेऊन येणार जाणून घेऊ…
२५ जून २०२५ आजचे राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 25 June 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd