Dhanteras 2025 Lucky Zodiac Signs : पाच दिवसांचा दिवाळीचा सण धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर रोजी असणार आहे. धनत्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणूनही ओळखले जाते; जी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी अवतार घेतात. या दिवशी धनदेवता कुबेर यांची पूजा केली जाते. तर या या धनत्रयोदशीला कोणत्या राशी भाग्यवान असतील याबद्दल जाणून घेऊयात…
या धनत्रयोदशी काही अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. ब्रह्म योग रात्री उशिरापर्यंत तर अत्यंत शुभ शिव योग देखील याचदिवशी जुळून येणार आहे. त्यामुळे या योगांच्या प्रभावामुळे चार राशीच्या लोकांना विशेष लाभ होतील आणि त्यांच्या आर्थिक समस्याही दूर होतील.
मेष – धनत्रयोदशीला मेष राशीच्या लोकांना मोठे फायदे होऊ शकतो. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग समोर येतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कदाचित अडकलेले पैसे पुन्हा मिळतील, जास्त पगाराची नवीन नोकरी मिळण्याची संधी देखील मिळू शकते. अनपेक्षित लाभामुळे आर्थिक अडचणी कमी होतील. भौतिक सुखसोयी आणि सुविधा तुमच्या अवतीभोवती नांदतील.
कन्या – धनत्रयोदशीला कन्या रास असणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा होईल. त्यांना नोकरीत उच्च पद मिळू शकते. बेरोजगारांना चांगली बातमी मिळेल. एखादा कायदेशीर वाद संपणार आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकणार आहे. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होईल; त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आनंदी जीवनाबरोबर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ – या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप भाग्यवान ठरेल. नोकरीत बढती, व्यवसायात नफा, नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. पैसे कमविण्याचे प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल; जोडीदाराकडू पाठिंबा आणि आदर मिळेल.
धनु – ज्यांची रास धनु आहे त्यांना धनत्रयोदशीला खूप फायदा होईल. संपत्तीचे मार्ग खुले होतील, उत्पन्न वाढेल. जुन्या गुंतवणुकीमुळे लक्षणीय नफा मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि मजबूत होईल. जीवनात आनंद येईल, सामाजिक आदर आणि नकळत यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल.