Shash Rajyog and Budhaditya Rajyog: दिवाळी हा अनेकांचा आवडता सण आहे त्यामुळे देशभरातमध्ये हा सण सर्वात जास्त उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दिपावली साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजनही केले जाते. यंदा १ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार असून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी बुधादित्य राजयोगासह शश राजयोग निर्माण होत आहे तसेच आयुष्मान योगही निर्माण होत आहे. या योगांच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात धन-संपत्ती आणि भौतिक सुख प्राप्त होईल.

या तीन राशींना मिळणार ऐश्वर्याचे सुख

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना दिवाळीचा काळ खूप लाभदायी ठरेल. या काळातील शुभ योगांच्या प्रभावाने तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. शनी देवासह सूर्य आणि बुधाची तुमच्यावर कृपा होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनाही बुधादित्य आणि शश राजयोग खूप शुभ फळ देणारे ठरेल. हा काळ सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

हेही वाचा: नवरात्रीमध्ये मिळणार बक्कळ पैसा; केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ

मिथुन

दिवाळीचा शुभ काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. मेहनतीचे गोड फळ मिळेल. आरोग्यही चांगले राहील. प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 24 after almost 30 years shash rajyog and budhaditya rajyog created on diwali three zodiac signs will get earn lots off money sap