Saturn Retrograde In Meen Rashi: ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह म्हणून ओळखले जाते. शिवायकर्मफळदाता शनी हा सर्वात क्रूर ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी ग्रह प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. अलीकडेच शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. २०२७ पर्यंत शनी या राशीत राहील. या काळात त्याची स्थिती बदलत राहील. पंचांगानुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी
दिवाळी असून याच दिवशी शनी वक्री होणार आहे. शनी मीन राशीत वक्री होईल, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
शनी चमकवणार ‘या’ तीन राशींचे भाग्य
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या राशीत जन्मलेल्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. या राशीच्या लोकांचे प्रत्येक कामातील अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकतील. जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हचे प्लॅन होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते. आर्थिक गुंतवणूकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. पण, वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. मकर राशीच्या आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेशात व्यवसायाचा योग आहे. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. कोणत्याही कामातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात कुंभ राशीना परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. अध्यात्मात खूप रस असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल. अनेक अनोळखी लोकांशी मैत्री होईल. शनीच्या साडेसातीपासून आराम मिळू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. तुमचे आयुष्य हळूहळू पुन्हा रुळावर येईल. व्यवसायात तुम्हाला काही जोखीम घ्यावी लागू शकते, पण तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)